उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक 115 मिमी पाऊस ः मागील वर्षीच्या तुलनेत 50 मिलिमीटर कमी पाऊस
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 102.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी 158.1 मिमी पाऊस झाला होता. दरम्यान, मागील वषीच्या तुलनेत 56 मिमी पाऊस यंदा कमी झाला आहे.
मागील वर्षी 158.1 मिमी पाऊस तर सर्वसामान्य पाऊस 127.6 इतका झाला होता. यंदा ही आकडेवारी 102.5 मिमी आहे. जून महिन्यात पेरणीसाठी आवश्यक पाऊस पडतो. पण पुढे जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांना फटका असतो. यंदाही जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दरम्यान, शेतकऱयांनी पेरणी करताना पुरेशी ओल झाली आहे का याची खातरजमा करून पेरणी करावी.
सोलापूर जिह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर व सूर्यफूल पिकांचा समावेश आहे. सोयाबीन, उडीद पेरणीस काही भागात सुरुवात झाली असून कमी पाऊस झालेल्या तालुक्मयात पाऊस बघून पेरणी करा, असे सांगितले आहे. यंदा जिह्यात जून महिन्यात विविध तालुक्मयात चांगला पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून काही ठिकाणी पेरणीचे काम सुरू झाले आहे. मात्र, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. काही शेतकऱयांनी पेरणी केलेली आहे तर काही शेतकऱयांनी अजून पूर्णपणे पेरणी केली नाही. नदी, नाले, ओढे, उजनी धरण अद्यापही भरलेले नाही.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
तालुका पाऊस
उत्तर सोलापूर 115.9
दक्षिण सोलापूर 90.8
बार्शी 107.3
अक्कलकोट 102.0
मोहोळ 91.1
माढा 97.7
करमाळा 99.2
पंढरपूर 104.0
सांगोला 101.9
माळशिरस 113.0
मंगळवेढा 89.1
एकूण 102.5
मागील वषी 158.1 मिमी पाऊस
उत्तर सोलापूर 128.2, दक्षिण सोलापूर 116.9, बार्शी 166.4, अक्कलकोट 106.5, मोहोळ 176.8, माढा 187.3, करमाळा 174.3, पंढरपूर 139.4, सांगोला 166.8, माळशिरस 175.9, मंगळवेढा 184.1 एकूण 158.1 तर सर्वसामान्य 127.6 मिलिमीटर पाऊस झाला होता.









