वार्ताहर / पंढरपूर
मुदबाह्य संपलेली व विक्रीस बंदी असताना किटकनाशकांची विक्री करीत असलेल्या कासेगाव ता.पंढरपूर येथील कृषी मिञ अॅग्रो एजन्सीवरती तालुका कृषी अधिकारी यांनी मंगळवार दि.१५ रोजी कारवाई केली आहे. यात १२ लाख रुपयांची किटकनाशके व औषधे जप्त करण्यात आली असून किटकनाशक अधिनियम १९६८ चे कलमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी कृषी केंद्र मालकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कासेगाव ता.पंढरपूर येथे फिरोज युसुफसाहेब शेख यांचे कृषी मित्र अॅग्रो एजन्सी नावाचे कृषी केंद्र दुकान आहे. याठिकाणी कृषी विभागाच्या कारवाईत कृषी धन अॅग्रो इंडस्ट्रीज,पुणे या कंपनीचे ग्रोप्लावर या नावाचा नायट्रोबेंजिन हे किटक नाशक पाच लिटरचे एकुण ५ नग, एक लिटरचे किटक नाशक ३१ बॉटल आढळुन आले. तसेच कासेगाव येथील गोडाऊनमध्ये ग्रोप्लावर या नावाचा नायट्रोबेंजिन ५ लिटर कॅन्डमध्ये सापडले. वैध्य मुदत संपलेले एकुण ८८ वेगवेगळया कंपनीचे व प्रकारचे किटकनाशके औषधे विक्रीस ठेवलेले बॉटल व बंद प्लॅस्टीक पॉकेट आहेत. त्यांची अंदाजे किंमत ही बारा लाख रु. होत असून पंचनामा करुन कृषी दुकान कृषी विभागाकडून सील करण्यात आले आहे.
यामध्ये कृषी केंद्राचे मालक फिरोज युसुफसाहेब शेख रा.कासेगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर यांच्यावरती तालुका पोलिस ठाण्यात किटक नाशके अधिनियम १९६८ चे कलम ९,१३,१७,१८,२९ व किटकनाशके अधिनियम १९७१ कलम ९,१०,१५ तसेच किटकनाशके अधिनियम १९६८ चे क्र. १५ व खंड ४ नियम १० (अ), नियम १२ (अ), चे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढीत तपास पोलिस निरिक्षक किरण अवचर हे करीत आहेत.
शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
वरिष्ठ अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सोलापूर व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या टीमसह कासेगाव येथील कृषी केंद्रावरती कारवाई केली आहे. तपासाअंती दुकान सील करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी मुदतबाह्य किटकनाशके खरेदी करु नयेत. याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. – आर.वाय.पवार [ तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग,पंढरपूर ]
Previous Articleअंगणवाडी सेवकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी
Next Article करमाळा शहरासह तालुक्यात ७० पॉझिटिव्ह









