2 महिलांची सुटका ; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सोलापूर
गजबजलेल्या एसटी स्टॅण्ड समोरील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी महिला सुधारग्रहाकडे करण्यात आली.
बसस्थानकासमोरील अनिल कॉटेज येथे वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अनिल कॉटेज येथे छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी पिडीत दोन महिला आढळून आल्या. विक्रम ऊर्फ विकी महादेव पवार (रा. वसंत विहार), गिरिष अनिल पवार (रा. मुरारजी पेठ धरमस्ती लाईन), मोहसिन सरदार तांबोळी (वय 26 रा. निराळेवस्ती, मनोहर झोपडपट्टी) आणि सुतार नावाच्या इसमांनी त्या पीडितांना लॉजमध्ये डांबून ठेवून त्यांना व्यवसाय करण्यास भाग पाडत होते.
शिवाय त्यांच्या शारीरिक कमाईवर स्वता:ची उपजीविका करीत असल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे पोलिसांनी चौघांविरुध्द फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल केला. आणि अटकेतील एकाला 27 नोव्हेंबर पर्यतची पोलीस कोठडी घेतली. अन्य तिघा आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









