प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात जिह्यात 66 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 149 जण कोरोनामुक्त झाले आहेत. वेगवेगळय़ा इस्पितळातून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार सोमवारी जिह्यातील 66 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 34 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरातील 23 व ग्रामीण भागातील 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान गेल्या 24 तासांत कोरोनामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. गोकाक येथील एक महिला, बेळगाव शहर व उपनगरातील दोन रहिवासी व रामदुर्ग तालुक्मयातील एका रहिवाशाचा यामध्ये समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसार मृतांची संख्या 287 वर पोहोचली आहे.
सोमवारी आयटीबीपीमधील 5, हिंडाल्को परिसरातील 3 व सांबरा एटीएसमधील एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 149 जणांना घरी पाठविण्यात आले असून जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 19 हजार 86 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 हजार 507 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या 2 हजार 298 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. मार्कंडेयनगर, गुडस्शेड रोड, पिरनवाडी, रामनगर, रेव्हीन्यु कॉलनी, सांबरा, शहापूर, शास्त्राrनगर, श्रीनगर, टिळकवाडी, वडगाव, काकती, भरत कॉलनी, गुरुप्रसाद कॉलनी, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामध्ये दोघा बिम्स् कर्मचाऱयांचाही समावेश आहे.









