नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत घसरल्याने देशांतर्गत बाजारात पुन्हा सोने स्वस्त झाले आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 94 रुपयांनी कमी झाला असून प्रतितोळा 52 हजार 990 रुपये झाला आहे. सोनेदरात कपात झाली असली तरी चांदीच्या भावात 782 रुपये प्रतिकिलोग्रॅमने वाढ झाल्याने 69,262 रुपयांवर पाहोचला आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात आणखी घट होईल, अशी अपेक्षा सराफा व्यवसायातील तज्ञांनी केली आहे.
एचडीएफसी सिक्मयुरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 53,084 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 52,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तसेच मुंबईत 99.9 टक्के सोन्याचा भाव घसरून 52,390 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
शुक्रवारी चांदीच्या भावात मात्र वाढ झाली. दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीचा भाव 68,480 रुपयांवरून 69,262 रुपयांवर आला आहे. या दरम्यान किंमतीत 782 रुपये वाढ झाली आहे. तर मुंबईत चांदीचा भाव वाढून 67 हजार 390 रुपये प्रति ग्रॅमवर आला आहे.









