प्रतिनिधी/ बेळगाव
सोनार गल्ली वडगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे वितरण करण्यात आले. शहर व उपनगरांमध्ये डेंग्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव परिसरात घरोघरी जाऊन हे औषध नागरिकांना दिले आहे.
डॉ. योगेश द्रवीड यांच्याकडून हे औषध देण्यात आले. यावेळी मंडळाचे रमेश धामणेकर, सचिन जाधव, सचिन भोसले, नामदेव कोळेकर, मयूर सुणगार, एन. एस. पाटील, विनोद पाटील, हणमंत धामणेकर, शुभम फुटाणे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..









