सेवाक्षेत्रातील विकासाचा 7 वर्षांमधील उच्चांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्पादन क्षेत्रात जानेवारीत गेल्या विकासदराचा गेल्या आठ वर्षांमधील उच्चांक नोंदविल्यानंतर आता सेवाक्षेत्राही देशाने मोठी प्रगती साधल्याचा निष्कर्ष पीएमआय निदेशांकांनुसार काढण्यात आला आहे. सेवा क्षेत्राचा जानेवारीतील विकासदर गेल्या 7 वर्षांमधील सर्वाधिक असल्याचे या निर्देशांकानुसार दिसून येत आहे.
देशातील मध्यम आणि मोठय़ा कंपन्यांच्या मुख्य खरेदी व्यवस्थापकांनी हा निर्देशांक निर्मिला आहे. प्रत्येक महिन्यात सेवा पुरवठादार केंद्रांमध्ये मागणी किती होती, किती रोजगार निर्माण झाले आणि उलाढाल किती झाली याची माहिती मिळवून हा निर्देशांक तयार केला जातो. ते विश्वासार्ह मानला जातो.
जानेवारी 2020 मध्ये सेवाक्षेत्राचा हा निर्देशांक 55.5 अंकांपर्यंत पोहचला. ही प्रगती समाधानकारक मानण्यात येत आहे. डिसेंबर 2019 मध्ये तो 53.3 होता. अशाच प्रकारे आगामी महिन्यांमध्ये तो वाढता राहिल्यास अर्थव्यवस्था रूळावर येत असल्याचे स्पष्ट होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धातच अर्थव्यवस्था गतीमान होण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. तसे घडल्यास ते सर्वांसाठीच एक शुभवर्तमान असेल.








