ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर पहिल्या टप्प्यात हस्ताक्षर झाल्यानंतर आज शेअर बाजारात तेजी आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 187 अंकांच्या वाढीसह 42059.45 स्तरावर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 9.70 अंक म्हणजे 0.08 टक्क्यांनी वाढून 12,377 झाला आहे.
दरम्यान, येस बँक, गेल, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, जी लिमिटेड, भारती एअरटेल, पावर ग्रिड आणि एसबीआयचे समभाग हे शेअर तेजीमध्ये आहेत. तर वेदांता लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, टायटन, टाटा मोटर्स, एम अँड एम आणि कोल इंडियाचे शेअर घसरले आहेत.
निफ्टीतही ऑटो इंडेक्स 0.03 टक्के, पीएसयू बँक इंडेक्स जवळपास 0.32 टक्के, खासगी बँक इंडेक्स 0.18 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.









