विविध कलरमध्ये उपलब्ध होणार फोन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंग आपला गॅलेक्सी झेड फ्लिप 3 क्लॅमशेल स्मार्टफोन येत्या 3 ऑगस्ट रोजी सादर करणार आहे. हा फोल्डेबल स्क्रीनवाला स्मार्टफोन आहे. गिजमोचायनाच्या अहवालानुसार सदरच्या स्मार्टफोनची सुरुवातीची किमत ही 999 ते 1099 डॉलर (जवळपास 73500 ते 80900 रुपये) राहणार असल्याचे संकेत आहेत.
या स्मार्टफोनचा प्रोमो व्हिडीओ लिक झाला असून यामध्ये अशी माहिती मिळते की फोन टू टोन डिझाइन आणि मल्टीकलर पर्याय आहे. ग्रे, व्हाईट, पर्पल, ग्रीन, ब्लॅक, बॅज, ब्लू आणि पिंक आदी रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.









