घरातून बाहेर न पडता घेता येणार सुविधांचा लाभ
वृत्तसंस्था /गुरुग्राम
भारतातील सर्वात विश्वासार्ह कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगने सोमवारी देशात स्वतःच्या संपर्कविरहित सेवांच्या अंर्तत मोबाईलसाठी नवी पिक-अप तसेच ड्रॉप सेवा सुरू केली आहे. सॅमसंग सेवा केंद्रावर जाणारे ग्राहक आता स्वतःच्या मोबाईलला घरीच डिलिव्हर करविण्यासाठी ड्रॉप ओन्ली सेवेचा पर्याय निवडू शकतात. सॅमसंग स्मार्टफोन आणि टॅबलेट ग्राहकांना स्वतःच्या उपकरणाची सर्व्हिस करविण्यासाठी घरातील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडावे लागू नये याची काळजी या सुविधेद्वारे घेतली जाणार आहे.
मोबाईल उपकरणासाठी ही पिक-अप आणि ड्रॉप सेवा 46 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यात दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे, बेंगळूर, अहमदाबाद, गाजियाबाद, फरिदाबाद, नोएडा, चंदीगढ, लुधियाना, जालंधर, जयपूर, उदयपूर, जोधपूर, आग्रा, लखनौ, वाराणसी, देहरादून, गुवाहाटी, भुवनेश्वर, पाटणा, दुर्गापूर, रांची, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सूरत, वडोदरा, भोपाळ, इंदौर, रायपूर, राजकोट, जबलपूर, कोइम्बतूर, मदुराई, कोची, कालिकत, तिरुपति, हुबळी, हैदराबाद, विजयवाडा आणि विशाखापट्टणम सामील आहे. ही सेवा या शहरांच्या महापालिका क्षेत्रात येणाऱया नॉन कंटेन्मेंट झोन वगळून क्षेत्रांमध्ये प्रदान केली जाणार आहे. तेथे संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
ग्राहक स्वतःच्या गॅलेक्सी ए, गॅलेक्सी एम, गॅलेक्सी एस, गॅलेक्सी एफ, गॅलेक्सी नोट आणि गॅलेक्सी फोल्ड सीरिजच्या स्मार्टफोनसह टॅबलेटच्या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. ग्राहकांच्या घरातून डिव्हाइसचे पिक-अप आणि ड्रॉपमध्ये सामील कर्मचारी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतील.
मोबाइलच्या दुरुस्तीसाठी पिक अँड ड्रॉप आणि ड्रॉप ओन्ली सेवेचा लाभ अनुक्रमे 199 रुपये आणि 99 रुपयांच्या किफायतशीर सुविधा शुल्कासह घेतला जाऊ शकतो. ग्राहक विविध डिजिटल पेमेंट पर्यायांच्या माध्यमातून या सेवेसाठी रक्कम भरू शकतात.
सॅमसंगमध्ये सर्वोच्च प्राथमिकता ग्राहकांच्या भल्याला असून आम्ही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना सुविधा प्रदान करण्यासाठी प्रत्येक आवश्यक पाऊल उलचण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. या अवघड काळात नव्या पिक-अप आणि ड्रॉप तसेच ओन्ली ड्रॉप सेवा ग्राहकांना स्वतःच्या घरातून बाहेर न पडता मोबाईलची सर्व्हिस करविण्याची सुविधा प्रदान करणार असल्याचे उद्गार सॅमसंग इडियाच्या ग्राहकसेवेचे उपाध्यक्ष सुनील कटीन्हा यांनी काढले आहेत.
संपर्करहित सेवा

व्हॉट्सऍप सपोर्ट ः ग्राहक सॅमसंगच्या व्हॉट्सऍप सपोर्ट क्रमांक 1800-5-सॅमसंग (1800-5-7267864) वर एक संदेश पाठवून सेवेसाठी नोंदणी करू शकतात. व्हॉट्सऍपवर ते तांत्रिक सहाय्य प्राप्त करू शकतात. सेवा केंद्रांचे लोकेशन, दुरुस्तीची स्थिती, नव्या योजनांविषयी माहिती प्राप्त करू शकतील. तसेच अलिकडेच खरेदी करण्यात आलेल्या सॅमसंग उत्पादनांचा डेमो आणि इन्स्टॉलेशनसाठी विनंती करू शकतात. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे.
रिमोट सपोर्ट ः सॅमसंग कॉल सेंटर एजंट ग्राहकाच्या गॅलेक्सी स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्हीवर इंटरनेटच्या माध्यमातूनच दूरवरुन सहाय्य प्रदान करू शकतो. कॉल सेंटर एजंट त्वरित मदत करण्यासाठी ऑनलाइन स्वरुपातच समस्येचा शोध लावू शकतो.
लाइव्ह चॅट ः संकेतस्थळाच्या मदतीने त्वरित मदत प्राप्त करण्याची सुविधा ग्राहकांना मिळू शकते. येथे प्रशिक्षित एजंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित चॅट बॉट शिवाय कुठल्याही विलंबाशिवाय कुठल्याही प्रश्नाविषयी तत्काळ आणि अचूक माहिती प्रदान करतात.









