जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला आवर घालणे कठीण आहे. बिम्स्मध्ये कोरोनाग्रस्तांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सुवर्णसौधमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करा, अशी मागणी साईग्रूप ऑफ प्रेंडस् यांच्यावतीने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
खासगी इस्पितळामधून सर्वसामान्य जनतेला दर परवडणारा नाही. याचबरोबर सरकारी हॉस्पिटल्समध्ये जागा नाही. तेंक्हा सुवर्णसौधमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..









