प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागात होणाऱया साहित्य संमेलन संयोजकांची बैठक रविवार दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात आयोजित केली आहे. यावेळी बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी परिसरात साहित्य संमेलने आयोजित करणाऱया संयोजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रगतशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले आहे.









