नवी दिल्ली
बाजार नियामक सेबीने सिल्वर ईटीएफ(एक्सचेंज ट्रेडेड फंड)मध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिशानिर्देश सादर केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना गोल्ड ईटीएफच्या प्रकारामुळे गुंतवणूक करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म मजबूत मिळत आहे. फंड हाऊसेसला ट्रेकिंग एरर 2 टक्केपर्यंत निश्चित करण्यासाठी हे निर्देश सादर केले आहेत. फंड हाऊस 99.9 टक्के शुद्धता असणाऱया 30 किलो वजनाच्या चांदीला डेली स्पॉट प्राईसच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. सिल्वर ईटीएफचा एक्सपेंश रेश्यो स्कीमच्या असेट अंडर मॅनेजमेन्टसाठी एक टक्केच्या वर जाणार नसल्याची माहिती आहे.









