प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार शहापूर येथे अलीकडेच सुरू झालेल्या राजगणपती सिल्क या साडी शोरुमने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली असून उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा येथील ग्राहकांच्या प्रथम पसंतीची शोरुम ठरली आहे.
गेल्या अनेक दशकांपासून साडी व्यवसायात विश्वास, गुणवत्ता, दर्जा, योग्यदर व उत्तम ग्राहक सेवा यामुळे स्वतःच्या नावाचा ठसा उमटविलेल्या हेडा कुटुंबीयांकडून राजगणपती सिल्क हे दालन सुरू करण्यात आले आहे.
लग्न, साखरपुडा, स्वागत समारंभ किंवा इतर खास प्रसंगासाठी सिल्क साडय़ांची खरेदी करायची असली की बेळगाव-गोवा भागातील अनेक कुटुंबे सिल्कच्या साडय़ा निवडण्यासाठी चेन्नई, कांचीपुरम, म्हैसूर, बेंगळूर अशा ठिकाणी जातात. ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन राजगणपती सिल्कमध्ये उच्च दर्जाच्या रेशमी साडय़ांची विस्तृत श्रेणी सादर केली आहे. त्यामुळे वधू-वरांसाठी खरेदीचे एकमेव दालन असा लौकिक राजगणपती सिल्क बाबत होत आहे. फॅशन उद्योगात झपाटय़ाने बदलत असलेल्या टेंडसह उच्च दर्जाच्या रेशमी साडय़ांची विस्तृत श्रेणी येथे पाहायला मिळते.
अनोख्या पद्धतीने सुशोभित केलेल्या या चार मजली भव्य दालनामध्ये तळमजल्यावर दैनंदिन वापराच्या आणि आहेरासाठी दिल्या जाणाऱया सर्व प्रकारच्या साडय़ांचा समावेश आहे तर पहिल्या मजल्यावर फॅन्सी साडय़ा, सिल्क साडय़ा, आर्ट सिल्क साडय़ा व वधूसाठी लेहंगा विभाग आहे. दुसऱया मजल्यावर खास कांजीवरम, धर्मावरम, ब्रॉकेट, टिशू, कांची, बनारसी शालू, फॅन्सी साडय़ा, पैठणी तसेच प्युअर जरीच्या आणि अतिउत्तम दर्जाच्या साडय़ा आहेत. या मजल्यावर असलेल्या प्रिमियम स्टुडिओमध्ये आपल्याला एक वेगळेपण जाणवेल. चौथा मजला जो आहे त्यामध्ये पुरुषांसाठी लागणाऱया उत्तम श्रेणीच्या सूट, शेरवानी, जोधपुरी, कुर्ता, पायजमा, जाकेट्स, मोजडी, दुपट्टा, फेटा आदींच्या नवनवीन व्हरायटीज उपलब्ध आहेत. वधूवरांना लागणारी सर्वप्रकारची वस्त्रप्रावरणे देणारी ही एकमेव शोरुम आहे.
मालाच्या किमतीबद्दलही काळजी करण्याची गरज नाही. कारण हेडा उद्योग समूह अनेक दशकांपासून कपडय़ांच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असून राजगणपती सिल्कमध्ये योग्य दरच आकारले जातात.









