अमेझॉन प्राइम व्हिडिओ करणार निर्मिती
प्रियांका चोप्रा सध्या स्वतःची वेबसीरिज ‘सिटाडेल’वरून चर्चेत आहे. ही सीरिज काही आठवडय़ांनी प्रदर्शित होणार आहे. तर आता अमेझॉन प्राइम व्हिडिओने सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीची घोषणा केली आहे. प्राइम व्हिडिओ आणि रुसो ब्रदर्सच्या एजीबीओची ही पहिली ग्लोबल-इव्हेंट सीरिज ठरणार आहे.
भारतीय आवृत्तीच्या या सीरिजमध्ये वरुण धवन मुख्य भूमिका साकारणार आहे. तर याचे दिग्दर्शन राज आणि डीके ही जोडी करणार आहे. या सीरिजची कहाणी सीता आर. मेनन आणि राज अँड डीके यांनी मिळून लिहिली आहे. या स्पाय सीरिजमधून वरुण धवन स्वतःचे स्ट्रीमिंग पदार्पण करणार आहे. याचे चित्रिकरण जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. ही सीरिज 240 हून अधिक देशांमध्ये प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

प्राइम व्हिडिओ माझ्यासाठी घरासारखे आहे. त्यांच्यासोबत स्ट्रीमिंग स्पेसमध्ये हा प्रवास सुरू करण्यासाठी रोमांचित आहे. रुसो ब्रदर्सचे एजीबीओ आणि जेनिफर सल्के यांच्याकडून कान्सप्चुअलाइज्ड, सिटाडेल एक विशेष महत्त्वाकांक्षी आणि रोमांचक प्रेंचाइज आहे. मी या प्रकल्पाचा हिस्सा होऊन अत्यंत उत्साही आहे. आता याचे चित्रिकरण सुरू करण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. इंडियन सिटाडेल आवृत्तीची कहाणी उत्तम असल्याचे वरुण धवनने सांगितले आहे.
आम्ही विशेष स्वरुपात बहुमुखी आणि गतिशील वरुणसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत मिळून मोठी मेहनत केली असल्याचे राज आणि डीके यांनी म्हटले आहे.









