मोक्सी मार्लिंस्पाइक पायउतार ; ब्रायन ऍक्टन यांना संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘सिग्नल’ या मॅसेंजिंग ऍपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मोक्सी मार्लिंस्पाइक यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर व्हॉटसऍपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्टन यांना अंतरिम सीईओ बनविले आहे. मोक्सीने आपल्या राजीनाम्याची माहिती ही ब्लॉग आणि ट्वीटच्या आधारे दिली आहे.
मोक्सीचे ट्विटरवर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, की या नवीन वर्षातच मी निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. सिग्नलचे सीईओंच्या रुपात स्वतःला बदलण्याची एक चांगली संधी असल्याचे स्पष्ट केले आहे.
ऍक्टनची सुरुवात व्हॉटसऍपपासून
ब्रायन ऍक्टन यांनी सीईओ पदाची धुरा हाती घेतली आहे. मात्र ऍक्टनने आपल्या करिअरची सुरुवात ही 2009 मध्ये केली होती. ज्यामध्ये सिग्नल सारखेच मॅसेजिंग ऍप आहे. वर्ष 2014मध्ये मेटा प्लॅटफॉर्म(फेसबुक)ने व्हॉटसऍपची खरेदी केली. तर 2017 मध्ये ऍक्टन यांनी व्हॉटसऍपचा राजीनामा दिला होता.
सिग्नलमध्ये 370 कोटीचे फंडिंग
वर्ष 2018मध्ये ऍक्टनने मोक्सीसोबत सिग्नल ऍपची सुरुवात एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या रुपाने झाली. ऍक्टनने त्यावेळी सिग्नलमध्ये 370 कोटी रुपयांचे फंडिंग दिले होते.









