ओरोस/प्रतिनिधी:-
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचा रॅपिड टेस्ट मध्ये कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .त्यानंतर त्यांनी स्वतःला होम आयसोलेशन करून घेत वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे .
गेली दोन वर्षे कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत समर्थपणे तोंड दिले मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी रॅपीड टेस्ट करताच कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे प्रशासकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाची गंभीर लक्षणे दिसत नसली किंवा मोठा धोका नसला तरी संसर्ग वेगाने वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळवी कोविडचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.








