सिंगापूरकडून एफडीआयमधून मोठी गुंतवणूक मिळते : तिमाहीचे जीडीपी आकडे सादर करणारा पहिला देश
वृत्तसंस्था/ सिंगापूर
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला थोपविण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेवर खूप गंभीर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने मागील तीन महिन्यात सिंगापूरच्या जीडीपीमध्ये 41.2 टक्क्मयांची घसरण झाल्याचे सांगितले आहे. सिंगापूरमध्ये कोणत्याही तिमाहीत इतकी मोठी घसरण आतापर्यंत कधीही राहिली नसल्याचेही म्हटले जात आहे.
कोविड19 च्या संसर्गामुळे जीडीपी तिमाहीचे आकडे सादर करणारा सिंगापूर हा पहिलाच देश ठरला आहे. सदरचे आकडे हे आशियातील अन्य देशांच्या तुलनेत सिंगापूरचा जीडीपी हा सर्वाधिक नुकसानीत राहिला आहे. यामध्येच जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीमध्ये 20 टक्क्मयांपेक्षा अधिकची घसरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याच कालावधीत चीनच्या जीडीपीत मात्र वृद्धीची नोंद करणार असून यासंदर्भातील आकडे येत्या आठवडय़ात सादर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारताला मिळणारी गुंतवणूक
सिंगापूर या कालावधीत भारतामध्ये सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक करणारा देश म्हणून ओळखला जातो. सरकारी आकडेवारीच्या मदतीने भारतात येणाऱया एफडीआयमध्ये सिंगापूरची 30 टक्के हिस्सेदारी आहे. दोन वर्षाच्या अगोदर मॉरिशसला मागे टाकत ही कामगिरी प्राप्त केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सिंगापूरने एफडीआयच्या माध्यमातून भारतात 14.67 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.









