प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘तरुण भारत’चे उपसंपादक प्रवीण सगुण मांजरेकर यांची शनिवारी बहुमताने निवड करण्यात आली. सचिवपदी प्रसन्ना राणे, खजिनदारपदी रामचंद्र कुडाळकर तर उपाध्यक्षपदी काका भिसे आणि उत्तम नाईक यांची निवड करण्यात आली.
निरीक्षक जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर आणि देवयानी वरसकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया नगरपालिकेच्या जिमखाना मैदान येथील टेनिस हॉलमध्ये झाली. सहसचिवपदी मंगल कामत आणि सदस्यपदी दीपक गावकर, मयुर चराटकर, मोहन जाधव, हेमंत मराठे, जतीन भिसे, उमेश सावंत, राजन नाईक, हर्षवर्धन धारणकर, परशुराम मांजरेकर यांची निवडही करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा संघाचे खजिनदार संतोष सावंत, उपाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर, अभिमन्यू लोंढे, मावळते अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर, अवधूत पोईपकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, अनिल भिसे, शिवप्रसाद देसाई, महादेव परांजपे, गुरुनाथ पेडणेकर, राजन नाईक, आशुतोष भांगले, विजय राऊत, ओंकार तुळसुलकर, प्रसाद माधव, परशुराम मांजरेकर, सुरेश गवस, सागर चव्हाण, संतोष परब, अभय पंडित, स्वप्नील उपरकर, नागेश पाटील, सचिन रेडकर, धनश्री मराठे, नरेंद्र देशपांडे, संजय भाईप उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय देसाई यांनी केले. तर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी पत्रकार संघाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी गजानन नाईक यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी तालुक्याचे काम उत्तम आहे. आगामी काळातही संघाने असेच काम करून दाखवावे. लवकरच तालुका पदाधिकाऱयांसाठी एक कार्यशाळा घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
नूतन अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी आगामी काळात पत्रकारांच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. आरेग्य तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट, पत्रकार उत्तम नाईक यांच्या पत्नी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर सागर चव्हाण यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.









