प्रतिनिधी /पर्वरी
गोव्याच्या उज्वल भविष्यासाठी येणाऱया विधानसभा निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवारांना संपूर्ण बहुमत देऊन निवडून द्या. गोव्यात आज अनेक पक्ष नाना आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करीत आहेत.त्यांना बळी पडू नका.मतदारांनी त्या त्या पक्षाचा इतिहास पाहणे गरजेचे आहे.आम्हाला गोव्याचे अस्तित्व भावी पिढीला जपून ठेवायला पाहिचे त्यासाठी चांगल्या उमेदवारालाच निवडून द्या . असे आवाहन भाजपचे मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे.साळगाव मतदार संघातील गिरी गावात काँग्रेस पक्षाचे तथा रेईस मागुस सरपंच केदार नाईक यांच्या घरोघर प्रचार दौऱयाच्या वेळी ते बोलत होते.यावेळी गिरी पंचायत माजी सरपंच फोंडू नाईक,पिळर्ण सरपंच संदीप बांदोडकर,अजय गोवेकर तसेच सहाही पंचायतीचे माजी सरपंच, पंच आणि ‘टूगेदर फॉर साळगावचे’ कार्यकर्ते मोठय़ा संख्येत उपस्थित होते.
आज साळगाव मतदार संघात काँग्रेस पक्षा निकातेच प्रवेश केलेलं केदार नाईक यांनी आज गिरी भागातील देवदेवतांचे दर्शन घेवून प्रचाराला सुरवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केदार नाईक यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.या प्रचार फेरीत कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कालपासून निवडणूक आचारसंहिता लागली आहे.त्यामुळे आम्ही आज पासून प्रचारकार्याला सुरवात केली आहे.मला या मतदारसंघातील सहाही पंचायतीचा पूर्ण पाठिंबा आहे.या वेळीस लोक पक्षाला न पाहता उमेदवाराला पाहून मतदान करणार आहे.त्यामुळे याला या निवडणुकीत विजयी होण्याची जास्त खात्री आहे.तसेच कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा मला आहे.असे केदार नाईक यांनी सांगितले.
यावेळी सांगोल्डा पंचायत माजी सरपंच अविनाश नाईक, गिरी पंचायत माजी सरपंच फोंडू नाईक,पिळर्ण सरपंच संदीप बांदोडकर,अजय गोवेकर यांनी या प्रसंगी आपले विचार मांडले.









