नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशच्या जिल्हा पंचायत प्रमुख निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर भारताची मान्यवर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करणारा संदेश दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. राष्ट्रीय लोकदल या राज्यातील स्थानिक पक्षाचे नेते जयंत चौधरी यांनी सायना नेहवाल ‘सरकारी शटलर’ असल्याची टीका केली. राज्यातील 75 जिल्हा पंचायतींच्या प्रमुख पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 67 जागा जिंकल्याचा दावा केला असून इतर पक्षांचा धुव्वा उडाला आहे.









