अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 9 मार्च 2022, सकाळी 11.10
● जिल्ह्यात सोमवारी 788 चाचण्या
● पॉझिटिव्हीटी 0.52 वर
● फक्त जिल्हा कोरोना मुक्त घोषित होणे उरले
● चार तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण
सातारा / प्रतिनिधी :
मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात सातारा जिल्ह्यात केवळ 4 रुग्ण बाधित आले आहेत. जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. संसर्ग कमी झाल्याने काल जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
सात तालुके शून्यावर
काल रात्री आलेल्या अहवालात कराड, खटाव, सातारा, वाई तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण बाधित आला आहे. तर सात तालुके निरंक आले आहेत. चाचण्यांची संख्या घटली असून 788 चाचण्या झाल्या आहेत. बाधित वाढीची टक्केवारी 0.51 टक्के इतकी कमी आहे. संसर्ग कमी झाल्याने जिल्हा मोकळा श्वास घेत आहे.
बुधवारी
नमुने-788
बाधित-4
बुधवारपर्यंत
नमुने-25,59,969
बाधित-2,79,113
मृत्यू-6,689
मुक्त-2,71,659









