सातारा / प्रतिनिधी :
कोरेगाव-भीमा येथील 500 वीरांच्या विजयाला आज 203 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरेगाव-भीमा येथे होणारा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरे करण्याचे सरकारचे आदेश असल्याने आज सातारा येथे आंबेडकरवादी संघटनेने आंबेडकर स्मारक येथे शौर्य दिवस उत्साहात साजरा केला. समता सैनिक दलाचे सैनिक तसेच सेवानिवृत्त सैनिक अधिकारी यांनी बाबासाहेब आबेडकरांना अभिवादन करून शौयदिवस साजरा केला.
यावेळी समता सैनिक दलाचे स्वयंसेवक, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे रफिक मुलाणी, भागवत पारडे, शाहीर प्रकाश फरांदे, चंद्रकांत खंडाईत, अशोक भिसे, अण्णा वायदंडे,आप्पा तुपे आदी उपस्थित होते.









