सातारा प्रतिनिधी
समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींचे दर्शन घेण्याकरता दुचाकीवरुन सातारा शहरातून तब्बल 100 दुचाकीवरुन 200 जण सकाळी निघाले. त्यांच्या या यात्रेची सुरुवात भगवा ध्वज दाखवून करण्यात आली. यावेळी साताऱ्यातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अतुल शालघर, नगरसेवक धनंजय जांभळे, बाबूजी नाटेकर, रवीकुमार कोठावळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सुभाष दर्भे, मुकूंदराव आफळे, महेश शिवदे आदी उपस्थित होते. यावेळी निघालेल्या रॅलीबाबत बोलताना बाबूजी नाटेकर म्हणाले, समर्थ रामदास स्वामी यांनी 11 मारुतींची प्रतिष्ठापना केली. हे सर्व मारुतीं जेथे आहेत. त्या ठिकाणी जावून त्यांचे दर्शन घेण्याची परिक्रमणा करणे म्हणजे एक प्रकारे भक्तीचा योगच आहे. ही परिक्रमणा पूर्ण केल्याने युवकांच्यामध्ये आणखी नवचैतन्य येवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.