सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात असलेली सदर बझार पोलीस चौकी अखेरची घटका मोजत आहे. 1985 साली दिवंगत नेते छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. दरवर्षी ही चौकी पावसाळ्यात गळत असल्याने कोणत्यातरी पक्षाच्या बॅनरने पत्रा झाकून येथे काम करावे लागत असल्याने पोलिसांची मोठी कसरत होत आहे. छतावरील लाकडे कुजली असल्याने कोणत्याही क्षणी ती पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. आतमधील अतिमहत्वाची कागदपत्रे पावसाने भिजत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे रेकॉर्ड नष्ट होण्याच्या घटना घडत आहेत.गृहराजमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात पोलीस चौकी अखेरची घटका मोजत असल्याने त्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.











