प्रतिनिधी / औंध
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तालुक्यातील हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली आहे. तो जाज्वल्य इतिहास जपण्यासाठी गटतट हेवेदावे बाजूला ठेवून एकसंघपणे काम करावे असे आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
वडगांव ज.स्वा.ता खटाव येथे हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांत अश्विनी जिरंगे, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, सभापती रेखा घार्गे, हुतात्म्यांचे वारसदार वसंतराव घार्गे, रमेश बेलवडेकर, सपोनि उत्तमराव भापकर, पुसेसावळीचे उपसरपंच सुरेशबापू पाटील, विकास घार्गे, माजी सरपंच संतोष घार्गे, दिपा जांदे, रवी घार्गे, समाधान घार्गे, संतोष कदम, नंदकुमार घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घार्गे म्हणाले कि कोरोनाचे वैश्विक संकट आज देशासमोर उभे राहिले आहे. हुतात्म्यांनी ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी हौतात्म्य पत्करले होते. आपण या महामारीचा एकसंघपणे मुकाबला करून कोरोनाला हरवूया. खटाव तालुक्याला आणि वडगावला हुतात्म्यांचा मोठा वारसा लाभला आहे. नव्या पिढीने त्यागाचा इतिहास जपण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याकरिता लागणारी मदत करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे यंदा सार्वजनिक स्वरुपाचा मोठा कार्यक्रम आयोजित न करता अतिशय साधेपणाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अभिवादनाच सोहळा उरकण्यात आला.
गटबाजीची दरी कायम
कोरोनाच्या महामारीत गटतट विसरून सर्वजण एकसंघपणे लढत आहेत. तरी देखील दरवर्षी प्रमाणे यंदाही हुतात्म्यांना अभिवादनाचे दोन कार्यक्रम स्वतंत्र पार पडले. कोरोनाच्या संकटात देखील हुतात्मा दिनाची वाढलेली गटबाजीची दरी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









