प्रतिनिधी / सातारा
मला चांगलीच शाळा पाहिजे, गावाजवळील शाळा पाहिजे, डोंगरावरची नको, नवरा बायकोला जवळची किंवा एकच शाळा पाहिजे, अशा भन्नाट मागण्या शिक्षक बदली वेळी केल्या जातात. अशीच मागणी या ही बदली वेळी विस्थापित या गोंडस नावाखाली काही शिक्षकांनी केली अन् आपली शाळा सुरू केली. एक दिवस शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना येरबडून काढले. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सोमवारी सुरू होणार होती सकाळी 11 ला परंतु शिक्षक पुढाऱ्यांच्या मागण्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी वाचून दाखवल्या. पुढे काही पुढारी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांना भेटले अन् दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रक्रिया सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे बोलले जात होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








