पाच घरे फोडुन 2 लाख95 हजारांचा ऐवज लांबवला
प्रतिनिधी/सातारा
वाई येथील सिद्धनाथवाडी येथे चोरट्यानी पाच घरे फोडून दिवाळी साजरी केल्याची घटना घडली आहे. सुमारे 2 लाख 95 हजारांचा ऐवज रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिद्धनाथवाडी येथील आशा चिकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.17रोजी त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी रात्री त्यांच्या घराबाहेर कुत्री भूकण्याचा आवाज येत होता. दाराची ठकठक शेजारील रामचंद्र जंगम यांना ऐकू येत होती. मात्र, ते आजारी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी सकाळी 7 वाजता चिकणे यांना फोन करून माहिती दिली. त्या सकाळी 9 वाजता आल्या अन पाहिले तर चोरट्यानी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून कपाटात ठेवलेले 1 लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. अशाप्रकारे अभिशेष राजकुमार कदम, आनंदा नामदेव गाडे, धीरज राठोड आणि राजेंद्र धायगुडे यांच्या घरात चोरी झाली असून काहींचे दार उघडण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोतेवार हे अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleपुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच : महापौर
Next Article जगाला आता अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सची चिंता









