औंध / प्रतिनिधी :
राजकीय धुळवड, गटतट बाजूला ठेवून वांझोळी ग्रामस्थांनी पुन्हा ऐक्याची वज्रमूठ आवळली आणि ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीची गुढी उभी केली आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सार्वजनिक उत्सवात वांझोळी ग्रामस्थांनी एकी दाखवली आहे. निवडणुकीमुळे गावातील वातावरण दुषित होण्यापेक्षा सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कंबर कसली. सर्वानुमते सात जागेसाठी सातच अर्ज भरायचे निश्चित झाले. त्यानुसार आरक्षनिहाय सात अर्ज दाखल करून बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
किसन आत्माराम मगर, बाळू मारुती मोटे, तन्वीर भिमराव वाघमारे, राजश्री शशिकांत मगर, सुनिता दत्तात्रय मगर, सविता तात्यासाहेब मगर, अनुसया लक्ष्मण माने यांची पुढील पाच वर्षासाठी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.









