23,24 जानेवारीला नोएडा येथे स्पर्धा
औंध / प्रतिनिधी :
नोएडा (उत्तरप्रदेश) येथे होणाऱ्या 65 व्या वरिष्ठ पुरुष फ्रीस्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा रविवार 10 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या ‘स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल’ कात्रज येथे होणार आहेत. अशी माहिती कुस्तिगीर परिषदचे कार्यालीन सचिव ललित लांडगे यांनी दिली.
23 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत नोएडा येथे ही स्पर्धा होणार आहे. कोरोना संकटातून थोडासा दिलासा मिळताच प्रतिष्ठेच्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे भारतीय कुस्ती महासंघाचे वतीने आयोजन करण्यात आले आहे. 57,61,65,70, 74,79,86, 92,97 125 किलो वजनगटात ही स्पर्धा होणार आहे.
गेल्या दोन वर्षातील राज्य पातळीवरील स्पर्धेतील प्रथम तीन विजेते क्रमांक, राष्ट्रीय विजेते तसेच आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतील सहभागी मल्ल यांनाच या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होता येईल.अधिकृत तालीम संघ, वरीष्ठ पुरुष, प्रशिक्षक व पालक यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.









