प्रतिनिधी / सातारा
गेल्या दोन दिवसांपूर्वी शिक्षकांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रिया पारदर्शक अशी राबविण्यात आली. गतवर्षी ज्या बारा शिक्षकांवर अन्याय झाला होता. त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे कौतुक होत आहे. या बदल्यांवेळी नियुक्तीचे आदेश दिले नव्हते, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता दोन दिवसात नियुक्ती आदेश पोहच होतील, असे सांगितले. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी तरुण भारतने बदली प्रक्रियेबद्दल वास्तवदर्शी प्रकाश टाकल्याने त्यांनी तरुण भारतचे आभार मानले. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीची प्रकिया लवकरच पूर्ण करण्यात येईल असे ही सांगितले.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सुचनेनुसार विनंती बदल्यांची प्रक्रिया सातारा जिल्हा परिषदेत राबवण्यात आली. या प्रक्रियेत काहीजणांनी विरोध नोंदवला तर काहींनी सहकार्य केले. गतवर्षी ज्या 12 शिक्षकांच्यावर अन्याय झाला होता. त्यांना न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्या बदलीत एकदम पारदर्शकता आणत बदली प्रक्रिया पार पडली. या झालेल्या शिक्षकांना दोन दिवस झाले नियुक्ती आदेश मिळाले नाही. अशी कुणकुण सुरू झाली. एका शिक्षकाने फोन करून तरुण भारतकडे विचारणा केली की स्वतंत्र दिन जवळ आला आहे. त्या शिक्षकांना त्या शाळेवर जाऊन तयारी करावी लागेल, त्याकरता नियुक्ती आदेश कधी मिळणार अशी शंका विचारली. शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता आजच त्या शिक्षकांना मिळतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी तरुण भारतने बदली प्रक्रियेबाबत वास्तवदर्शी बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल आभार मानले. दरम्यान, त्यांनी जे आंतरजिल्हा बदलीने येणार आहेत. त्या शिक्षकांना त्या जिल्ह्यातून मुक्त केल्यानंतर येथे समायोजन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









