सातारा / प्रतिनिधी :
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून धावपटू अलमास मुलाणी यांनी मिळविलेले यश जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी प्रेरणादायक असल्याचे मत कोरेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दादासाहेब सरकाळे यांनी व्यक्त केले.
72 कि.मी सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या शिक्षक संघाच्या मार्गदर्शक शाबिरा मुल्ला, दादासाहेब सरकाळे यांनी अलमास मुलाणी यांचा सत्कार करुन त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रविण घाडगे यांनी केले. स्वागत वैशाली मतकर यांनी केले. अरुण घोरपडे यांनी आभार मानले.
यावेळी संतोष जगताप, निर्मला जगदाळे, शाबिरा मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वाती चव्हाण, प्रगती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.









