सातारा / प्रतिनिधी :
नवीन वर्षात नवीन कामे अन् नवीन फाईल्स टेबलावर येण्यास प्रारंभ झाल्याने जुन्या कामांच्या फाईल्स बाजूला ठेवण्याचे काम आज दिवसभर सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण आणि बांधकाम उत्तर या दोन्ही विभागात सुरु होते. दोन्ही विभागाचे अभियंता कामात मग्न होते. कर्मचाऱ्यांमध्ये कामांची लगबग दिसत होती.
सातारा जिल्हा परिषदेत बांधकाम दक्षिण आणि उत्तर हे दोन्ही विभाग महत्वाची भूमिका बजावतात. त्या दोन्ही विभागात ग्रामीण भागाकडून शाळा खोल्या दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती, पुलांचे बांधकाम, रस्तांचे काम, गटरची कामे आदी कामे केली जातात. आर्थिक वर्ष जरी मार्चनंतर सुरु होत असले तरीही नवीन वर्ष हे जानेवारीला सुरु होते. नवीन वर्षात जुन्या फाईलींचा विशेष करुन विना कामाच्या फाईल्स बाजूला काढून नवीन कामाच्या फाईल पुढे ठेवण्याचा निपटारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सुरू होता.