रात्रीच्या अहवालात 277 बाधित, सोमवारी 17 बाधितांचा मृत्यू, सातारा तालुका वाढ कायम
कराडसह सर्वत्र वेग मंदावला, सातारा 114, जावली 30 बाधित
कराड 29, खटाव 29 बाधित, फलटण 22, वाई 19 बाधित
प्रतिनिधी / सातारा
सप्टेंबरमध्ये सातारा जिल्हय़ात कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. बाधितांची प्रचंड वाढणारी संख्या अंगावर काटा आणत होती. शेवटी जिल्हय़ात नागरिक स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन करुन कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करु लागले होते. सप्टेंबरच्या अंतिम सत्रात कोरोनाने नांगी टाकली आणि ऑक्टोबरच्या आरंभी बाधित वाढीचा मंदावत चाललेला वेग जिल्हय़ाला दिलासा देत आहे. सध्य परिस्थितीत सातारा तालुका व शहर हॉटस्पॉट ठरले असतानाच हॉटस्पॉट ठरलेल्या कराडमध्ये मंदावलेला वेग कराडवासियांना उभारी देणारा आहे. महाबळेश्वरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असून तिथे वेग 90 टक्के मंदावलाय.
हॉटस्पॉट ठरलेल्या कराडात फक्त 29 बाधित
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून हॉटस्पॉट ठरलेला कराड शहर व तालुका आता सावरु लागला असून रविवारच्या रात्रीच्या अहवालात खूप दिवसांनी 277 एवढय़ा कमी संख्येने आली. यामध्ये कराड तालुक्यात फक्त 29 नवीन बाधित आहेत. लवकरच कराडसह जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी यापुढे देखील आरोग्य विभागासह जिल्हावासियांना आवश्यक त्या काळजी घेवून हा लढा जिंकण्यासाठी अशीच एकजुटीने कंबर कसली पाहिजे.
जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 277 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 17 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरानाबाधित अहवालामध्ये
सातारा तालुका 114 बाधित
सातारा 20, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, मल्हार पेठ 2, बुधवार पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, करंजे 6, सदरबझार 4, शाहुपरी 4, गोडोली 2, शाहुनगर 1, जकातवाडी 1, राजसपुरा पेठ 1, वाढे 3, खेड 5, एमआयडीसी सातारा 1, जिहे 1, पोतदार स्कूल जवळ 1, यादोगोपाळ पेठ 2, केसरकर पेठ 2, नेले 1, म्हसवे 4, संगममाहुली 23 गजवडी 1, सत्यमनगर सातारा 1, वनवासवाडी 1, शेंद्रे 3, राऊतवाडी 1, वेणेगाव 1, रामाचा गोट सातारा 1, फत्यापुर 1, प्रतापगंज पेठ 1, संभाजीनगर 2, लिंब 2, पाटखळ 1, संगमनगर 2, देगाव 1, अहिरे कॉलनी 1, कोडोली 1, पंताचा गोट 1, कामाठीपुरा सातारा 2, विलासपूर सातारा 1.
जावली तालुका 30 बाधित
निझरे 4, मोरावळे 1, सोमर्डी 2, ओझरे 4, केळघर 3, कुसुंभी 4, मेढा 1, वाळुत 1, कुसुंबी 4, भणंग 2, कुसुंबी मुरा 1, मालचौंडी 1, मोहाट 1, एकीव 1.
कराड तालुका 29 बाधित
कराड 2, मंगळवार पेठ 1, उंब्रज 1, ओगलेवाडी 2, मलकापूर 4, विद्यानगर 2, टेंभू 1, मसूर 4, आटके 9, नांदगाव 1, कोयना वसाहत 2.
खटाव तालुका 29 बाधित
गणेशवाडी 3, वडूज 5, कातरखटाव 12, शिंगाडवाडी 3, सिद्धेश्वर कुरोली 1, निढळ 1, डोभेवाडी 1, खातवळ 1, कोकराळे 1, पुसेगाव 1.
फलटण तालुका 22 बाधित
बुधवार पेठ 2, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1, पिंप्रद 1, जाधववाडी 6, सासवड 1, आदर्की बु 7, कापडगाव 2, तरडगाव 1.
वाई तालुका 19 बाधित
वाई 1, रविवार पेठ 1, ब्राम्हणशाही 2, गणपती आळी 3, बावधन 1, पिराचीवाडी 1, गंगापुरी 1, भुईंज 6, मधलीआळी वाई 1, धर्मपुरी 1, सिद्धनाथवाडी 1.
पाटण तालुका 7 बाधित
तारळे 2, आंबवडे खुर्द 2, मुंद्रूककोळे 1, ढेबेवाडी 1, गुढे 1.
खंडाळा तालुका 9 बाधित
बोरी 1, बेलवडे खुर्द 2, शिरवळ 1, केसुर्डी 1, लोणंद 4.
महाबळेश्वर तालुका 3 बाधित
पाचगणी 3.
माण तालुका 9 बाधित
दहिवडी 4, लोधवडे 3, पिंगळी बु 1, गोंदवले 1.
कोरेगाव तालुका 9 बाधित
कोरेगाव 1, देऊर 1, वाठारस्टेशन 1, जायगाव 1, साप 1, तारगाव 1, भादवले 1, पिंपोडे बु 1, भाडळे 1
इतर : साळवण मर्ढे 1, साळशिरंबे 1, ढोरोशी 1, वाघोली 1, बोरगाव 1, सरताळे 1, भोसगाव 1, मानेवाडी 2, जाधवाडी 1
जिल्हय़ात 17 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सातारा 77 वर्षीय महिला, बोरगाव ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, अतराळ ता. सातारा 60 वर्षीय महिला, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, केसरकरपेठ सातारा 86 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा 60 वर्षीय पुरुष, निझरे ता. सातारा 75 वर्षीय महिला. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये पुजारी कॉलनी ता. फलटण 63 वर्षीय पुरुष, कराड 65 वर्षीय पुरुष, सदरबझार ता. सातारा 65 वर्षीय महिला, कोळकी ता. फलटण 75 वर्षीय पुरुष, कराड 70 वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली ता. कराड 60 वर्षीय महिला. तर रात्री उशिरा कळविलेले निवले ता. पाटण 78 वर्षीय महिला, जाधववाडी ता. फलटण 46 वर्षीय महिला, मुंजवडी ता. फलटण 85 वर्षीय पुरुष, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, अशा एकूण 17 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,51,093
एकूण बाधित 39,445
कोरोनामुक्त 30,092
मृत्यू 1,251
उपचारार्थ रुग्ण 8,102