● आमदार मकरंद पाटील बाधित
● जिल्हय़ात 15 बाधितांचा मृत्यू
● प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्ण 4,804
● जिल्हय़ात 1,792 होम आयसोलेट
● कराडात आतापर्यंत 30 डॉक्टर्स बाधित
● नॉन कोव्हिड रुग्ण वाऱयावर
● कोरोना बळीं चारशेच्या उंबरठयावर
● 2 सप्टेंबर पासून अनलॉक 4.0 सुरू
सातारा प्रतिनिधी
जिल्हय़ात कोरोनाची स्थिती गंभीर होवू लागलीय. दररोज 500 च्या आसपास बाधित रुग्ण आढळून येत असल्याने ही संसर्ग स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सतर्क रहावे लागणार आहे. संख्या वाढल्याने बाधित रुग्णांना बेडस उपलब्ध होत नसल्याच्या घटना घडत असून दुसरीकडे नॉन कोव्हिड रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होवू लागलाय. कराड शहरात आतापर्यंत तब्बल 30 डॉक्टर्ससह त्यांच्याकडे कार्यरत असलेले 40 कर्मचारी बाधित असल्याने ही हॉस्पिटल्स बंद आहेत. हीच कमी जास्त स्थिती जिल्हय़ात असून दररोज वाढणारी बाधितांची संख्या, बळींची संख्या कहर करणारीच ठरलीय. कोरोना बळींची संख्या चारशेच्या उंबरठय़ावर उभी आहे. शासनाने 2 सप्टेंबर पासून अनलॉक 4.0 सुरू केला असून यामध्ये जिल्ह्यात हॉटेल लॉजिंग व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुुुरू होणार आहे.
असा आहे अनलॉक 4.0
रात्री 8:45 वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शासनाच्या आदेशानुसार आलेल्या अनलॉक 4.0 ची माहिती दिली. यामध्ये मार्केटचे टाइमिंग सकाळी नऊ ते सात हे पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. यामध्ये नव्याने हॉटेल, लॉजिंग, सार्वजनिक प्रवासी वाहतूक याला परवानगी देण्यात आलेली आहे. सार्वजनिक सभा, संमेलने यासह शाळा-महाविद्यालय, खाजगी क्लासेस बंद राहणार असून धार्मिक स्थळे , मंदिरे, प्रार्थनास्थळे वरील बंदी कायमच आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षाखालील लहान मुले यांना वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. औद्योगिक आस्थापना दिलेल्या परवानगीनुसार नियम पाळून सुरू राहतील. मास्क न वापरल्यास 500 सार्वजनिक ठिकाणी थुंकूल्यास एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 489 जणांचा अहवाल बाधित असून यामध्ये सातारा तालुक्यात तब्बल 138 बाधित आहे. त्यापाठोपाठ कराड तालुक्यात 75 व माण सोडल्यास इतर सर्वच तालुक्यात दोन अंकी संख्येने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 661 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला असून दिवसभरात 384 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*जिल्ह्यातील 394 जणांची कोरोनावर मात*
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 7, कराडतालुक्यातील 67, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 11, कोरेगाव तालुक्यातील 27, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 22 पाटण तालुक्यातील 6, फलटण तालुक्यातील 36, सातारा तालुक्यातील 135, वाई तालुक्यातील 62 व असे एकूण 394 नागरिकांचा समावेश आहे.
*आमदार मकरंद पाटील कोरोना बाधित*
वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा अहवाल कोरोना बाधित आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना स्थितीत गेल्या चार पाच महिन्यापासून ते सातत्याने मतदारसंघात जात होते. नागरिकांना येणाऱया अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा लोकांशी संपर्क येत होता. तालुक्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा अहवाल बाधित आल्याने त्यांना साताऱयातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर त्यांची प्रकृती स्थिर असून ते यातून लवकर बरे होतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
*जिल्हय़ात 15 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथे कडगाव ता. पाटण 79 वर्षीय महिला, दुर्गापेठ सातारा 70 वर्षीय पुरुष, राजापुरी ता. खटाव 30 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा 67 वर्षीय पुरुष, कवडेवाडी कोरेगाव 75 वर्षीय पुरुष, जावळे ता. फलटण 58 वर्षीय महिला. कराड खाजगी हॉस्पिटलमध्ये पाटण 76 वर्षीय महिला, गोळेश्वर कराड 55 वर्षीय पुरुष, पापर्डे ता. पाटण 52 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड 57 वर्षीय महिला तर सातारा खाजगी हॉस्पिटलमध्ये शिरवळ ता. खंडाळा 64 वर्षीय पुरुष, डीसीएच म्हसवड येथे पुसेगाव ता. खटाव 79 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण 58 वर्षीय पुरुष, पुसेसावळी ता. खटाव 60 वर्षीय पुरुष, भाटी ता. माण 55 वर्षीय महिला असे एकूण 15 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
*कराडात आतापर्यंत 30 डॉक्टर्स बाधित*
कराड शहरात कोरोनामुळे स्थिती बिकट होत असतानाच नॉन कोविड रुग्णांचीही स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नॉन कोविड रुग्णालयातील तब्बल 30 हून अधिक तज्ञ डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याकडे असलेला 40 हून अधिक स्टाफही बाधित आहे. त्यामुळे शहरातील 15 हून अधिक नॉन कोविड रुग्णालयांचे काम ठप्प आहे. त्यामुळे कोरोनासह नॉन कोविड रुग्णांवर उपचाराची स्थिती बिकट झाली आहे. उपचार न मिळाल्याने तीन नॉन कोविड नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तीच स्थिती कायम राहिल्यास नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर शिल्लक राहणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.
*उपचारार्थ रुग्णांची संख्या 4804*
सध्या एकूण बाधितांची संख्या 13 हजार 997 असली तरी त्यापैकी 7 हजार 307 कोरोनामुक्त आहेत. उपचारार्थ रुग्णांची संख्या 6 हजार 407 असली तरी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्यांची संख्या 4 हजार 804 एवढी आहे. तर 1 हजार 792 लक्षणे नसलेले रुग्ण होम आयसोलेट आहेत. या रुग्णांचा होम आयसोलेशनचा कालावधी 10 दिवसांचा असून त्यानंतर त्यांना काहीच त्रास झाला नाही की ते कोरोनामुक्त ठरणार आहेत. मात्र मृत्यू दर रोखण्याचे आव्हान अद्यापही समोर असून सोमवारी जिल्हय़ातील 15 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*खासगीसह शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार*
जिल्हा रुग्णालय 383, कृष्णा हॉस्पिटल कराड 383, सहय़ाद्री कराड 89, संजीवन हॉस्पिटल सातारा 36, फलटण 21, मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातारा 25, साईअमृत हॉस्पिटल 30, सिम्बॉयसिस हॉस्पिटल 35, सातारा हॉस्पिटल 36, समर्थ हॉस्पिटल 20, प्रतिभा हॉस्पिटल 37, बेल एअर पाचगणी 48, गीतांजली हॉस्पिटल वाई 24, कोरेगाव ग्रामीण रुग्णालय 30, मायणी डीसीडीएच 26, श्रध्दा क्लिनिक कराड 22, संचित हॉस्पिटल वाई 33, श्री हॉस्पिटल कराड 43, धन्वंतरी म्हसवड 6 अशी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आहे.
*728 जणांचे नमुने तपासणीला*
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण 41, कोरेगाव 65, वाई 46, खंडाळा 79, रायगांव 48, पानमळेवाडी 115, मायणी 43, महाबळेश्वर 53, पाटण 15, खावली 24, ढेबेवाडी 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 136 असे एकूण 728 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
*सोमवारपर्यंत जिल्हय़ात*
घेतलेले एकूण नमुने 45,057
एकूण बाधित 14,658
घरी सोडण्यात आलेले 7,592
मृत्यू 397
उपचारार्थ रुग्ण 6,669
*सोमवारी जिल्हय़ात*
एकूण बाधित 661
एकूण मुक्त 384
एकूण बळी 15
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









