सातारा / प्रतिनिधी :
ऐतिहासिक गोडोली गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी देवस्थानचे प्रमुख मानकरी शंकरराव बापू मोरे-पाटील व पोपटराव जिजाबा मोरे-पाटील यांनी नुकतीच प्रत्येकी 1 लाख 11 हजार 111 रुपये देणगी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत संकपाळ, सचिव व्यंकटराव मोरे व विश्वस्त यांच्याकडे सुपूर्द केली.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत संकपाळ यांनी दोन्ही देणगीदारांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गोडोलीतील ग्रामस्थांनी व परिसरातील सर्व भाविकांनी मंदिर उभारणीसाठी सढळ हाताने देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन केले. देवस्थान ट्रस्टचे सचिव व्यंकटराव मोरे यांनी मंदिर बांधकामाच्या आराखडय़ाविषयी तसेच देवस्थान ट्रस्ट राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विश्वस्त पोपटराव मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.









