प्रतिनिधी / केळघर
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुभडी भरुन वाहू लागले आहेत. पावसाचा जोर वाढल्यामुळे केळघर (ता. जावली) येथील ओढयाला पूर आल्याने येथील पूलाचे बांधकाम चालू असून पर्यायी रस्त्याचा भराव वाहून गेल्याने सातारा – महाबळेश्वर वाहतुक ठप्प झाली. तर वेण्णा नदीला आलेल्या पूरामुळे नांदगणे- पुनवडी दरम्यानच्या पुलावरुन पाणी वाहून त्यावरील डांबर, खडी भराव वाहून गेल्याने या परिसरातील वाहतुक ठप्प झाली असून हा पूलही वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
केळघर परिसरात जून महिन्यानंतर ओढ दिलेल्या मान्सूनचे काल ( बुधवारी ) जोरदार आगमन झाले. गेल्या दिवस- रात्र पडलेल्या संततधार पावसाने वेण्णा नदीसह ओढे- नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर सातारा – महाबळेश्वर या रस्त्याचे काम व येथील ओढा पुलाचे बांधकाम सध्या संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी पर्यायी रस्ता बनवला आहे. परंतू ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने या ओढयातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पश्चिमेकडील शेती दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
तर केळघर घाटातही दरडी कोसळत असून त्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम चालू आहे. मात्र या रस्त्याचे काम पावसाळा तोंडावर असूनही मे महिन्यापासून अतिशय संथगतीने चालू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव , दगड -धोंडे ओढ्या- नाल्यातून वाहून जाऊन नांदगणे येथील शेतात जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे.
बांधकाम विभागाने या रस्त्यावरील वाहतूक आंबेघर -डांगरेघर- पुनवडी मार्गे नांदगणेवरुन महाबळेश्वर अशी वळवण्यात आली आहे. सहायक पोलीस निरिक्षक अमोल माने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णात निकम यांनी घटनास्थळी भेट देवून कामगारांना सतर्क रहाण्यास सांगितले आहे. दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे उपअभियंता निकम यांनी सांगितले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









