कोरोनाच्या भीतीपेक्षा उपाशी राहण्याची मोठी भीती
प्रतिनिधी// सातारा
कोरोनाचा अक्षरशः सातारा जिह्यातील कहर सुरू आहे.लॉक डाऊन केले तरीही हा कहर कमी होत नाही.थोडीशी शिथिलता मिळताच सातारा शहरातील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसू लागले आहेत.पहाटेच्या सुमारास तर भाजी खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी होत आहे.सोशल डिस्टनन्स कुठे दिसतं नाही.कोरोनाची भीतीच ही गर्दी पाहून दिसतं नसून नागरिकांना भूक भागवण्यासाठी बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र सद्या दिसत आहे.सातारा पालिकेचे धडक पथक अचानक कारवाई करत असून शुक्रवारी सकाळी 5 ते 6 वाजे पर्यंत या पथकाने साडे पाच हजार रुपयांचा दंड केला आहे.
कोरोनामुक्त होण्यासाठी सातारा शहरात नियम पाळणे महत्वाचे बनले आहे.नियम पाळणारे हाताच्या बोटावर दिसत आहेत.कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड कमी करण्यासाठी लॉक डाऊन हा उपाय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केला आहे.त्याच लॉक डाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळताच शहरात नागरिक मोकाट फिरताना दिसू लागले आहेत.प्रशासन राबत असले तरीही नागरिक किती दिवस घरात बसायचे म्हणून बाहेर पडताना दिसू लागले आहेत.त्यात काही दुकानदारांना नियमावली माहिती नसल्याने त्यांच्याकडून दुकाने उघडली जात आहेत.त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत.
पालिकेने नेमलेले धडक पथक अचानकपणे जाऊन जेथे गर्दी होत आहे तेथे जाऊन कारवाई करत आहेत.पथकाने शुक्रवारी सकाळी एका तासात साडे पाच हजारांचा दंड वसूल केला.या पथकाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत प्रदीप पवार यांच्याकडून विना मास्क प्रकरणी 500 रुपये दंड, संभाजी जयसिंग जाधव यांच्याकडून 500 रुपये दंड, शंकर शिंदे,जनार्दन वलेकर, सोनाली संदीप, मैला नदाफ, जुबेर शेख, विकास कांबळे, अनिल चिकणे यांच्याकडून मास्क न लावल्याप्रकरणी प्रत्येकी 500 रुपये, गजानन ट्रेडिंग कंपनी सोशल डिस्टनन्स 1हजार रुपये असा साडे पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांनी नेमलेल्या पथकात अतिक्रमणचे प्रशांत निकम यांच्यासह कर्मचायांनी केली.
नियमाला फाटा देणारे नागरिक मोठय़ा प्रमाणावर
सातारा शहरात अनेक नागरिक नियम मोडून बिनदिक्कतपणे फिरत असतात.त्याना कोरोनाची बाधा होईल याची कसलीच भीती नसल्याचे दिसते.पोलिसांनी कारवाई केली तरी ते पुन्हा रस्त्यावर उतरले दिसतात.









