देवराष्टे/वार्ताहर
कडेगाव, पलुस सह तासगाव, खानापुर या तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे यंदाचे पहिले आवर्तन आजपासुन सुरू झाले. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
दरवर्षी ताकारी योजनेची रब्बी हंगामासाठी दोन व उन्हाळी तीन अशी साधारण पाच आवर्तन सोडण्यात येतात. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आवर्तन लांबले होते. हे आवर्तन साधारण पस्तीस ते चाळीस दिवस असणार आहे. सुरवातीला एक ते चव्वेचाळीस किमी. च्या कार्यक्षेत्रात पाणी देण्यात येणार आहे.
Previous Articleखेडमध्ये अपार्टमेंटमध्ये आग, लाखोंचे नुकसान
Next Article कर्नाटक: आज खासगी रुग्णालयाच्या ओपीडी राहणार बंद








