व्हनाळी / सागर लोहार
ग्रामीण भागात नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी असलेल्या साके – व्हनाळी ता.कागल या दोन्ही गावच्या आरोग्य उपकेंद्रांची गेल्या 4 वर्षात दुर्दशा झाली आहे. आरोग्य उपकेंद्रांना संरक्षक भिंतीही नाहीत, स्वच्छतागृह,पाणी व्यवस्थाच उपलब्ध नाही त्यामुळे लसीकरण,गरोदरमाता,लहान मुलांची तपासणी करतांना अनेक अडचणी निमार्ण झाल्या आहेत. शिवाय गेल्या कांही वर्षापासुन जुन्या इमारतीचे छप्पर लाकुड साहित्य खराब झाले आहे. शिवाय पावसाळ्यात गळती लागल्याने रूग्णांचे हाल होते. दरवाजे,खिडक्या यांना वाळवी लागली असून इमारतीला तडे गेल्याने कर्मचा-यांना जीव मुठीत घेवुन रूग्णसेवा द्यावी लागत आहेत.
गावाला सगळयात जवळचे उपचाराची सोय असलेले ठिकाण म्हणजे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ज्या ठिकाणी गरोदरमाता,लहान मुले यांच्या लसीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, नियमित पाणीपुरवठाही होत नाही अशा स्थितीत आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे. आरोग्य सेवा देताना इमारतच मोडकळीस आल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय उपलब्ध असलेल्या एका प्रस्तुती खोलीतच लसीकरण,तपासणी आदी सर्व कामे होतात त्याठिकाणी देखील स्वच्छतागृहाची पाण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यात गळती लागल्यामुळे दवाखान्यात पाणीच पाणी साचते त्यामुळे लहानमुले,गरोदरमात यांना लसीकरण करताना पाण्यातच कांही तास उभे रहावे लागते .त्यामुळे उपकेंद्र असून अडचण नसुन खोळंबा अशी आवस्था दोन्ही गावात निर्माण झाली आहे. शिवाय लोकसंख्येचा विचार करता दोन्ही गावात रूग्णांची संख्याही जास्त आहे.
गावच्या आरोग्य उपकेंद्रात जीवघेण्या बारा आजारांपासून बाळाचा बचाव करण्याकरता लसीकरण, गरोदर स्त्रियांची तपासणी, सोपी बाळंतपणे आणि बाळंतपणानंतरची योग्य काळजी,जोडप्यांना पाळणा लांबविण्याची आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांची माहिती देणे. Health Dayमलेरिया, टी.बी. कुष्ठरोग यावर उपचार करणे.,साध्या-मध्यम आजारांवर उपचार करणे., अंगणवाडया आणि शाळांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करणे., हगवण, न्यूमोनिया, यांसारख्या घातक आजारांवर उपचार आणि लहान मुलांची इतर काळजी. स्वच्छता आणि पाणी शुध्दीकरण याबाबत सल्ला आदी सुविधा मिळतात. गावचा सरकारी दवाखानाच समसेच्या गर्तेत सापडा असल्याने शासनाचे याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. याबाबत साके ग्रामसेवक,प्रशासक आरोग्य सहाय्यिका यांनी आरोग्य उपकेंद्राच्या निर्नलेखन होणेसाठी उपअभियंता बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे कळवले आहे. तेव्हा नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या सुरक्षेचा विचार करून तात्काळ साके व्हनाळी या दोन्ही गावात नवीन इमारत बांधून आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी केली आहे.
आरोग्य उपकेंद्रातून रूग्णांना मिळणा-या सेवा चांगल्या प्रकारे देण्याचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. साके -व्हनाळी या दोन्ही गावच्या जुन्या उपकेंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल अ्ॅडिटसाठी संबधीत विभागाशी पाठपुरावा करून नवीन इमारत उभारणीसाठी व रूग्णाना आरोग्यसेवेबरोबरच सुरक्षिता देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार
डॅा. अभिजीत शिंदे : वैद्यकिय आरोग्य अधिकारी कागल
स्ट्रक्चरल अॅाडिटच नाही.
भंडारा जिल्हयात इन्क्युबेटर रूमला आग लागल्यामुळे 9 नवजात बालकांना जीव गमवावा लागल्याची ह्दय द्रावक घटना घडल्यानंतर सरकारी दवाखान्यातील इमारतींच्या स्ट्रक्चरल अॅडिटचा प्रश्न एैरणीवर आला.त्या पार्श्वभुमिवर या इमारतीचे स्ट्रक्चरल अॅडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.









