तहसीलदार मिरज डी. एस. कुंभार
प्रतिनिधी / मिरज
२०२१च्या महापूरामध्ये बाधित झालेल्या सर्वच घटकांचे पंचनामे सुरु करण्यात आले असून पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार यांनी केली आहे.
माहे जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे मिरज तालुक्यातील नदीकाठावरील ग्रामीण भागामध्ये तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकांचे घर, गोठे, शेतीपिके, शेतजमिन व्यापारी दुकाने यांचे नुकसान झालेले आहे. तसेच पुरपरिस्थतीमुळे पुरबाधित गावामधील नागरिकांची स्थलांतर करण्यात आलेले आहे.
महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच नागरिकांचे स्थलांतराबाबत प्रशासनाकडुन महानगरपालिका क्षेत्राचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक इ. अधिकारी/कर्मचारी यांचेकडून पंचनामे करणेचे कामकाज सुरु आहे.
घर आणि शेतीच्या पंचनाम्याकरिता
- मालमत्ता क्रमांचा पुरावा 7/12 अथवा 8 अ पुराव
- बँकेचे पासबुक झेरॉक्स अथवा रद्द केला धनादेश
- आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे सादर करावेत.
व्यवसायाकरिता मालमत्ता क्रमांचा पुरावा
- बँकेचे पासबुक झेरॉक्स अथवा रद्द केला धनादेश
- आधार कार्डची झेरॉक्स
- व्यवसाय परवानाच पुरावा झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स अथवा मतदार यादीमध्ये नाव असलेचा पुरावा अथवा स्थानिक रहिवासी असलेला पुरावा अशी आहेत.