प्रतिनिधी / सांगली
सांगली – जुना कुपवाड रोड चैत्रबन ते गांधी कॉलनी मार्गावरील नाला चुकीच्या पद्धतीने दुरुस्त केल्याचा फटका बसून तुळजाईनगर परिसरात पाणीच पाणी झाले. गांधी कॉलनी, नेहरूनगर येथील काही घरात पाणी शिरले. महापालिकेने केलेल्या चुकीचा नागरिकांना फटका बसला असून तात्काळ पाणी हटवावे आणि नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण करावे अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांनी केली आहे.
Previous Articleबेंगळूरमध्ये नवीन एनआयव्ही लॅब होणार: आरोग्यमंत्री
Next Article शेततळ्यातील पाणी तात्काळ कमी करा : रवींद्र माने








