प्रतिनिधी / सांगली
गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने सांगली परिसरात झेंडूच्या फुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसाने फुले भिजल्याने शेतकऱ्यांना ही फुले रस्त्यावर टाकून द्यावी लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दसरा-दिवाळी तोंडावर असताना झेंडूची फुले कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सांगली परिसरात सांगलीवाडी, कवठेपिरान, दुधगाव, तुंग, कारंदवाडी, यासह मिरजवाडी या भागात झेंडूच्या फुलाचे प्रचंड नुकसान झाले आहे.