आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी शहरात गुरुवारी 3 पोलिसांसह 6 जण पॉझिटिव्ह आले. कर्त्यव्य बजावणारे पोलिसच कोरोना बाधित आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. आटपाडीत कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने तातडीने 3 दिवस कडकडीत बंद ठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
माडगूळे येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यांचा मुलगा पोलीस गाडी वर चालक आहे. त्याच्या संपर्कात आटपाडी पोलिस आले होते. त्यांचे नमुने घेतले होते पैकी 3 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांच्यासह शहरातील मध्यवर्ती भागात पुण्याहून आलेले एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आले दिवसात शहरात तीन पोलीस आणि तीन नागरिक पॉझिटिव आल्याने खळबळ माजली.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या आटपाडी शहरात ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी जनता कर्फ्यू गुरुवारी पाळण्यात आला होता. पण दिवसात सहा रुग्ण आढळल्याने आटपाडीतील प्रमुख नेते ग्रामपंचायत पदाधिकारी व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक होऊन शुक्रवार, शनिवार , रविवार हे तीन दिवस आटपडी शहरात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 30 जुलै अखेर शहरी भागात असलेल्या लॉकडाऊन प्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.








