वार्ताहर / दिघंची
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी जुना कराड पंढरपूर रस्ता बंद करून त्या रस्त्यावर भिंत बांधून रस्त्यात पेट्रोल पंप उभारून अतिक्रमण केले आहे. तसेच दूध डेअरी च्या नावाखाली शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. झालेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता पूर्ववत करावा या मागणीसाठी दिघंची येथे सोमवारी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत नवनाथ रणदिवे यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर अतिक्रमण काढून ही जागा पुन्हा एकदा शासनाला मिळावी व जुना कराड पंढरपूर रस्त्यावरील अतिक्रमण केलेली भिंत पाडून तो रस्ता पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली होती. हणमंतराव देशमुख यांनी पंढरपूर रस्ता बंद करून रस्त्यावरच भिंत बांधून पेट्रोल पंपाच्या नावाखाली रस्त्यावरच अतिक्रमण करून लोकांची गैरसोय केली आहे. तसेच दुध संघाच्या नावाखाली शासनाची करोडो रुपयांची जमीन लाटल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सदर दोन्ही जागांची चौकशी करून अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी नवनाथ रणदिवे यांच्यासह इतर नागरिकांनी महादेव मंदिर येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








