मिरज पंचायत समितीतील 9 कर्मचारी पॉझिटिव्हः जिल्हय़ातील 30 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 223 वाढलेः ग्रामीण भागात 775 रूग्ण वाढले
प्रतिनिधी/सांगली
सोमवारी जिल्हय़ात विक्रमी 998 रूग्ण वाढले आहेत. तर 375 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 32 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 30 आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 495 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 223 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात सोमवारी नवीन 223 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 138 तर मिरज शहरात 85 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तसेच मोठय़ाप्रमाणात रॅपीड ऍण्टीजन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर दहा हजारापेक्षा अधिक रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या वाढत चालली आहे. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या सहा हजार 489 झाली आहे.
ग्रामीण भागात आजपर्यंत सर्वाधिक 775 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात सोमवारी कोरोनाने हाहाकार केला आहे. ग्रामीण भागात ही रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात ग्रामीण भागात सर्वाधिक असे एका दिवसांतच हे रूग्ण वाढले आहेत. नवीन 775 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 30, जत तालुक्यात 26, कडेगाव तालुक्यात 26 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 91, खानापूर तालुक्यात 84, मिरज तालुक्यात विक्रमी 170 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 51, शिराळा तालुक्यात 46, तासगाव तालुक्यात 81 आणि वाळवा तालुक्यात विक्रमी 170 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात आजपर्यंत सर्वाधिक असे 775 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 30 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 30 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. 55, 78, 64 , 69 आणि 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर आणि 45 आणि 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरज शहरात सहा जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 67, 60, 75, आणि 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर 76 आणि 64 वर्षीय महिलांचा मृत्यू वानलेस हॉस्पिटल येथे झाला. तासगाव तालुक्यातील कुमठे येथील 77 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील शिगाव येथील 52 आणि येलूर येथील 89 वर्षीय व्यक्तीचा एसडीएच इस्लामपूर येथे मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील वळूज येथील 65 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील नावरसवाडी येथील 56 वर्षीय व्यक्तीचा सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. विटा येथील 60 वर्षीय व्यक्तीचा तसेच कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील 75 वर्षीय महिलेचा ओम श्री हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुपवाड येथील 52 वर्षीय व्यक्तीचा मेहता हॉस्पिटल येथे. हरिपूर येथील 55 वर्षीय महिलेचा घाटगे हॉस्पिटल येथे. वाळवा येथील 38 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वडीयेरायबाग येथील 58 वर्षीय व्यक्तीचा, तासगाव येथील 52 वर्षीय व्यक्तीचा , तसेच तासगाव चिंचणी येथील 71 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. पलूस येथील 48 वर्षीय व्यक्तीचा काकडवाडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, बुधगाव येथील 30 वर्षीय महिला आणि पद्माळे येथील 67 वर्षीय व्यक्तीचा मिरजेच्या कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 30 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 495 झाली आहे.
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
सोमवारी परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अथणी-शेडबाळ येथील 78 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे तर कोल्हापूर जिल्हय़ातील इचलकरंजी येथील 75 वर्षीय महिलेचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 103 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
मिरज पंचायत समितीतील नऊ जण पॉझिटिव्ह
जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाचा आता हा कोरोना मिरज पंचायत समितीमध्ये शिरला आहे. सोमवारी एकाच दिवशी मिरज पंचायत समितीमधील नऊ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला आहे.
375 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 375 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्णांची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढत चालली आहे. त्याप्रमाणात बरे होणाऱयांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या सात हजार 356 झाली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 12394
बरे झालेले 7356
उपचारात 4543
मयत 495
Previous Articleबार्शीतील कासारी येथे रेशन मोफत धान्य वाटले नसल्याची तक्रार
Next Article भादोलेत कोयत्याचा धाक दाखवून महिलेला लुटले








