नवे 1089 तर कोरोनामुक्त 901 : पॉझिटिव्हीटीचा दर 9.90 टक्के
21 जणांचा मृत्यू : महापालिका क्षेत्रात 196 वाढले : वाळवा तालुक्यात 216 वाढले
प्रतिनिधी / सांगली :
जिल्ह्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. मनपा क्षेत्रात सांगली शहरात 147 तर मिरजेत 49 रुग्ण वाढले. ग्रामीण भागात वाळवा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. येथे 216 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात नवे 1089 रूग्ण वाढले तर 901 कोरोनामुक्त झाले. उपचारात सध्या 8524 रूग्ण आहेत. तर उपचार सुरू असताना 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 9.90 टक्के झाला आहे.
901 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 901 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एक लाख 41 हजार 844 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील एक लाख 29 हजार 312 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
नवे रूग्ण 1089
उपचारात 8524
बरे झालेले 129312
एकूण 141844
मृत्यू 4008
शनिवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 71
कडेगाव 88
खानापूर 82
पलूस 126
तासगाव 62
जत 35
कवठेमहांकाळ 57
मिरज 87
शिराळा 69
वाळवा 216
सांगली शहर 147
मिरज शहर 49
एकूण 1089
लसीकरण
आजचे लसीकरण 2504
एकूण लसीकरण 793976
कोरोना चाचणी – 11388








