ऑनलाईन टीम / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बुधवार दि. 22 रोजी रात्री दहापासून आठ दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सांगली मिरज सारख्या मनपा, नगरपालिका, नगरपंचायत या भागात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल तर ग्रामीण भागातील लोकांनी जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
कोरोना रुग्णांचा दररोज वाढणारा आकडा आणि शेजारच्या सर्वच जिल्ह्यांनी पुकारलेला लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर आता सांगलीतही 22 ते 30 जुलैदरम्यान लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्र तसेच सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात यात येत आहे. तर उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळून सहकार्य करावे असे आव्हान पालकमंत्री जयंत पाटील केले आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील आमदार आणि खासदारांची ची बैठक घेतल्यानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद ही घोषणा केली. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्म। महापालिका आयुक्त नितिन कापडनीस यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून लॉकडाऊन करण्यात येत असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदीसाठी गर्दी करू नये. दोन दिवस असल्याने सर्वांना आवश्यक वस्तू मिळतील गर्दीने झुंबड करून बाहेर पडल्यास लॉकडाऊनचा हेतू यशस्वी होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी यांनी सहकार्य करावे असे आवाहन मंत्री पाटील केले. लॉकडाउन काळात कोणत्या आस्थापना अथवा सेवा सुरू राहणार आणि काय बंद होणार याची माहिती ती लवकरच जिल्हाधिकारी जाहीर करतील असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.








