1293 कोरोनामुक्तः महापालिका क्षेत्रात 167 वाढलेः ग्रामीण भागात 1408 वाढले
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक कोरोना रूग्ण वाढले आहेत. एकाच दिवशी एक हजार 575 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्येचा आकडा 81 हजार 486 इतका झाला आहे. तर उपचार सुरू असणाऱया 41 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दरही वाढू लागला आहे. ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. महापालिका क्षेत्रात 167 वाढले तर ग्रामीण भागात 1408 वाढले. उपचारात सध्या 14 हजार 102 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 167 वाढले
महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसून येत नसल्याने आठ दिवस जनता कफ्यू जाहिर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्णांची वाढ दिसून येत चालली आहे. मंगळवारी महापालिका क्षेत्रात 167 रूग्ण आढळून आले त्यामध्ये सांगली शहरात 85 तर मिरज शहरात 82 इतके रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 23 हजार 385 रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातील 72 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 1408 रूग्ण वाढले आहेत
महापालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे. तो कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत चिंतेचे वातावरण आहे. आटपाडी तालुक्यात 167, कडेगाव तालुक्यात 115, खानापूर तालुक्यात 238, पलूस तालुक्यात 64, तर तासगाव तालुक्यात 104 रूग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यात 203, कवठेमहांकाळ तालुक्यात 135, मिरज तालुक्यात 101 तर शिराळा तालुक्यात 62 आणि वाळवा तालुक्यात 219 रूग्ण आढळून आले आहेत.
41 जणांचे मृत्यू
जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही कमी होताना आढळून येत नाही. मंगळवारी उपचार सुरू असणाऱया 41 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सांगली शहरातील 9 तर मिरज शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात एक, कडेगाव तालुक्यात तीन तर खानापूर तालुक्यात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात दोन तासगाव तालुक्यात सहा तर जत तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील चौघांचा तर मिरज तालुक्यातील सहा जणांचा आणि वाळवा तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
1293 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांच्या संख्येतही मोठयाप्रमाणात वाढ होत चालली आहे. ही मात्र जिल्ह्यासाठी थोडीशी दिलासा देणारी गोष्ट आहे. मंगळवारी उपचार सुरू असणारे एक हजार 293 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर 64 हजार 955 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजही लसीकरण नाही
जिल्ह्यातील लसीचे सर्व डोस संपलेले आहेत. जिल्ह्याला अद्यापही लस मिळाली नाही. त्यामुळे बुधवारीही लसीकरणांवर याचा परिणाम दिसून येणार आहे. बुधवारी लस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरूवारी लसीकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले.
नवे रूग्ण 1575
उपचारात 14102
बरे झालेले 64955
एकूण बाधित 81486
मृत्यू 2429
मंगळवारचे तालुकानिहाय बाधित रूग्ण
आटपाडी 167
कडेगाव 115
खानापूर 238
पलूस 64
तासगाव 104
जत 203
कवठेमहांकाळ 135
मिरज 101
शिराळा 62
वाळवा 219
सांगली शहर 85
मिरज शहर 82
एकूण 1575
आजचे लसीकरण 1135
आजअखेर लसीकरण 566293








