प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्ह्यात नवीन 16 रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्ह्याचे एकूण रुग्ण संख्या 315 झाली आहे, तर दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रुग्ण संख्या 98 इतकी आहे. यातील तिघांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथील आठ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या, तर मणदूर येथील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. आरळा ,शेटफळे, गळवेवाडी, अवळाई ,बिळूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला या सर्व रुग्णांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
तर आज, 10 जण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये भाळवणी येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे. बुधगाव येथील दोन, वाटेगाव, इस्लामपूर ,येलूर ,गव्हाण, अंकले, येथील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनामुक्त झाली आहे.
Previous Articleसोलापुरात शहरात 25 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, 6 जणांचा मृत्यू
Next Article सातारा : 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह








